MLA Ravi Rana | खोक्यांशिवाय यांचे पान हालत नाही; रवी राणांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोक्यांशिवाय यांचे पान हालत नाही, असा आरोप रवी राणा (Ravi Rana) यांनी आदित्य ठाकरेंवर केला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून खोक्याचे राजकारण सुरु केले. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना किती खोके पाठविले, हे संपूर्ण महापालिकेला माहीत आहे. खोक्यांशिवाय यांची पाने हालत नाहीत. महापालिकेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालण्याचे काम या तिघांनी केले आहे, असा गंभीर आरोप रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे.

 

तसेच बाळासाहेबांचे विचार विसरून उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या (Congress) विचारांवर चालत होते. बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत. मात्र, विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदार आहेत. बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत, असे देखील रवी राणा म्हणाले.

 

रवी राणा यांनी बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यासोबत देखील वाद उकरून काढला आहे.
बच्चू कडू गुवाहाटी आणि सूरतला बंडखोर आमदारांसोबत (Rebel MLA) गेले होते.
त्यांनी पन्नास कोटी रुपये देखील घेतले आहेत, असे राणा म्हणाले होते. त्यावर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
1 नोव्हेंबरपर्यंत जर का राणा यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर केले नाहीत, तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ.
आमच्यासोबत 10 आमदार आहेत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

त्यामुळे राणा आदित्य ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यावर करत असलेल्या आरोपांचे ते पुढे काय पुरावे देणार
आणि त्यांच्यावर शिवसेनेचा ठाकरे गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- MLA Ravi Rana | ravi rana reply aaditya thackeray over bacchu kadu and ravi rana controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला