MLA Ravindra Dhangekar | आ. रवींद्र धंगेकर यांनी शनिवारवाडा परिसरातील वाड्यांच्या बांधकामवरील निर्बंधावर उठवला आवाज; विधानसभेत केली मागणी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन | शहरामध्ये अनेक ठिकाणी ऐतिहासिक पावित्र्य जपणाऱ्या वास्तू आहेत. मंदिरे आहेत. मात्र ती जतन करण्याच्या हेतूने 1992 साली या ऐतिहासिक वास्तूंच्या 100 मीटर परिसरामध्ये बांधकामावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र आता या निर्बंधाचा त्रास नागरिकांना होत असून तिथे राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. ही बाजू पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी अधिवेशनामध्ये मांडली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या नियमांमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी विधानसभेत केली.

पुण्याचे वैभव असणारे शनिवारवाडा (Shaniwarwada), पाताळेश्वर (Pataleshwar), आगाखान पॅलेस (Aga Khan Palace) येथील 100 मीटर परिसरामध्ये बांधकामांवर निर्बंध लादले गेले आहेत. मात्र प्रत्यक्षात या वास्तूच्या आजूबाजूला अनेक पडायला आलेले वाडे आहेत. या आजही 100 वर्षे जुन्या वाड्यांमध्ये अनेक नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. डगमगणाऱ्या वाड्याचे बांधकाम निर्बंधांमुळे होत नाहीये. नागरिकांची ही गंभीर समस्या आमदार धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशन चालू असताना विधानसभेत (Assembly Monsoon Session) मांडली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी होत धंगेकर यांनी वाड्यांच्या पुनर्विकासाचा (Wada Redevelopment) मुद्दा उपस्थित केला. या जाचक निर्बंधाचा फटका पेठांमधील वाड्यांच्या पुनर्विकासाला बसला असून परिणामी शहराच्या विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यात राहणाऱ्या नागरिकांचा जीव मेटाकुतीला आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.

पुण्यातील (Pune News) अनेक विकास मुद्दांमध्ये वाड्यांचा पुनर्विकासाचा मुद्दा नेहमीच पुढे आला आहे.
बांधकाम करण्यावर निर्बंध असल्याने नागरिकांना देखील मोडायला आलेल्या वाड्यांमध्ये रहावे लागत आहे.
आणि नियमांमुळे कोणतेही बिल्डर देखील पुढाकार घेत नाही. कसबा विधानसभा (Kasba Assembly)
पोटनिवडणूकीमध्येही वाड्यांच्या पुनर्विकास हा मुद्दा खूप गाजला. आता आमदार रवींद्र धंगेकर
(MLA Ravindra Dhangekar) यांनी विधानसभेमध्ये मागणी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Maharashtra Rain Update | राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; पुण्यासह सातारा, कोकण, रायगड आणि रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’

Supreme Court | ”मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

Google Search Enhances Women’s Sports Coverage for 2023 FIFA Women’s World Cup