MLA Rohit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांची बोचरी टीका; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काल (दि.१९) मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो ट्वीट करत त्यांना एका जुन्या भूमीपूजन कार्यक्रमाची आठवण करून दिली. तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी काल झालेल्या उद्घाटन समारंभावर देखील भाष्य केले आहे. (MLA Rohit Pawar)

 

काल (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यावर मत व्यक्त करताना रोहित पवार यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिले आहे की, काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!’ अशी बोचरी टीका त्यांनी या कार्यक्रमावर भाष्य करताना केली.

 

 

तसेच, त्याबाबतच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये रोहित पवार (MLA Rohit Pawar) लिहितात की, ‘मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारक भूमीपूजनासाठी आलेल्या गडकिल्ल्यांवरील पवित्र मातीन नक्कीच मुकअश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!’ असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, काल (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे अनेक विकास योजनांचे भूमीपूजन तसेच उद्घाटन केले.
यातील बहुतांश प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी दिल्याचे
म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर टीका केली. आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे जुने फोटो ट्वीट करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमीपूजनाची आठवण करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ मध्ये या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले होते.

 

 

Web Title :- MLA Rohit Pawar | ncp mla rohit pawar criticized pm narendra modi program in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा