MLA Sada Sarvankar | शिंदे गटातील सदा सरवणकर यांचा ठाकरे आणि राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘मनोहर जोशींच्या घरावर पेट्रोल टाकून…’

पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sada Sarvankar | शिवसेना गटामध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. अनेक गोष्टींचा खुलासा करत रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे घर जाळून टाका काहीच शिल्लक ठेऊ नका असा आदेश दिल्याचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आता खुलासा करत सांगितले आहे. त्यांच्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत सदा सरवणकर म्हणाले की, “मला संजय राऊतांचा फोन आला. तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही कुठे चालले? मला वाटलं मी मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे ते राऊतांना कशाला सांगायचं. ते मला म्हणाले की, तू मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चालला आहेस ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, उद्धव ठाकरेंकडून किंवा मातोश्रीवरून राऊतांनी याबाबत आधीच कुणीतरी सांगितलं असावं.”

ते पुढे म्हणाले की, “राऊतांनी मला मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे का विचारल्यावर
मी हो चाललो आहे सर असं उत्तर दिलं. त्यावर ते म्हणाले की, असाच जाऊ नकोस. जाऊन मनोहर जोशींचं घर जाळून टाक.
काही शिल्लक ठेऊ नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे. तिथून पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका,”
असे वक्तव्य सदा सरवणकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होऊ लागल्या.
त्यांनी केलेले आरोप गंभीर असून अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
सदा सरवणकर यांच्या या आरोपावर अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी उद्धव ठाकरे आणि
संजय राऊत यांच्यावर मनोहर जोशींचे घर जाळण्यास सांगितल्याचा आरोप केला.
यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “सदा सरवणकरांना काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर
आणि आता गद्दारांमध्ये गेल्यावर असं 20-25 वर्षांनी सांगत आहेत. त्याचवेळी सांगितलं असतं,
तर बरं झालं असतं.” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा