MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंना धक्का! संजय शिरसाटांना ‘त्या’ प्रकरणाात पोलिसांकडून क्लीन चिट; पोलीस म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून (Chhatrapati Sambhajinagar Police) मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरोधात विनयभंग (Molestation) करणारे विधान केल्या प्रकरणाच्या आरोपाबाबतच्या प्रकरणात संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना क्लीन चीट देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत एक विधान केले होते. या विधानाच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी पोलिसात (Parli Police) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संजय शिरसाट यांचे विधान छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे सांगत हे प्रकरण संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. संभाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.
या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी ज्यावेळी हे विधान केले. त्यावेळी सुषमा अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मी असेल कोणतेही वक्तव्य केले नव्हते.
पण एखाद्या गोष्टीचे बाऊ करणे आणि बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात गेल्या होत्या
आणि त्यांना न्यायालयाने फटकारले होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन स्वत: प्रसिद्धीत येण्याच्या घटनांना आळा बसणार आहे.
मी न्यायालयात गेलो नव्हतो, ते गेले होते. मात्र न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.
तसेच जी काही कायदेशीर लढाई लाढायची आहे ती लढणार असल्याचे शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
Web Title : MLA Sanjay Shirsat | police give clean chit to shivsena shinde group
sanjay shirsat about sushma andhare registered complaint
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ACB Trap News | 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune Crime News | लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणार्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक, 36 लाखाचा माल जप्त
- Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career | छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबीर संपन्न