MLA Shahajibapu Patil | ‘शरद पवारांसह अजित पवार शिवसेना संपवण्यासाठी…’, शहाजीबापू पाटील यांनी केला ‘त्या’ प्लॅनबद्दलचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे नेते शिवसेना (Shivsena) पक्षाला संपवण्यासाठी हळुवारपणे प्लॅन करत होते, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला.

शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) म्हणाले, शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला, तर लक्षात येईल की, त्यांच्याजवळ जे गेले त्यांना शरद पवारांनी हळूच चिरडून संपवलं. सगळे राजकीय पक्ष (Maharashtra Politics News) प्रेमाने त्यांच्याकडे गेले होते, मात्र शरद पवारांनी शेकापसह सर्व लहान पक्षांना संपवलं. शिवसेनेला तर शरद पवार कधीच माफ करु शकत नाहीत. कारण शिवसेनेच्या लोकांनी जेवढी शरद पवारांवर टीका केली, तेवढी कुठल्याही पक्षाने केली नाही.

शहाजीबापू पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीत शिवसेनेला 10 ते 15 जागांच्या वर जाऊ द्यायचं नाही,
यासाठी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते
हळुवारपणे प्लॅन करत होते. दुर्दैवी आमचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या काही आजाराच्या
कारणामुळे ही परिस्थिती बघायला मंत्रालयाकडे येत नव्हते.

हा धोका ओळखून हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना ही तडफदार वाटली पाहिजे, पुढे गेली पाहिजे.
या विचाराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व दिलं.
आमची शिवसेना वाढणार आणि सगळ्या निवडणुका प्रचंड मतांनी जिंकणार असा विश्वास शहाजीबापू पाटील
यांनी केला. तसेच सर्वसाधारण 40 आमदारांची यादी त्यांच्याकडे होती, यामध्ये मी देखील होतो,
असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Web Title :- MLA Shahajibapu Patil | shahajibapu patil on sharad pawar and ajit pawar plan rejection of candidature 40 shivsena mla

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया