MLA Shahajibapu Patil | ‘पवारांचे जोडे उचलूनही काका-पुतण्याने मला 20 वर्षे कोंडून ठेवले आणि आता…’, शहाजीबापू पाटील यांची तुफान फटकेबाजी

सांगोला : पोलीसनामा ऑनलाइन – सांगोल्याचे शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली आहे. पवारांचे जोडे उचलूनही पवार काका-पुतण्याने मला 20 वर्षे कोंडून ठेवले आणि आता हा म्हणतोय पवारांवर बोलायचे नाही, अशा शब्दात शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी आज फटकेबाजी केली. अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या सांगोला येथील धाराशिव साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार दीपक साळुंखे पाटील (Former MLA Deepak Salunkhe Patil) यांनी शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांना भाषण करताना डिवचले. सध्या राज्यात फक्त एकाच नेत्याच्या भाषणाची जोरदार चर्चा असल्याचा टोला लगावताना साळुंखे यांनी आता आजपासून पवार साहेबांवर बोलायचे नाही, असा संकल्प करण्याचा चिमटा शहाजीबापूंना घेतला. यावर शहाजीबापू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शहाजीबापू यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण पवार यांच्यासाठी काय काय केले हे सांगताना आम्ही त्यांची चप्पल सुद्धा उचलून त्यांच्या पायापाशी ठेवली होती. मात्र पवार काका-पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवल्याचा टोला लगावला.

सांगोल्यात प्रत्येक वेळी पवार यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकापला पाठिंबा दिल्याने त्यांची राजकीय कोंडी होत होती.
पवारांच्या मदतीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) विजयी होत होते आणि शहाजीबापू पराभूत होत होते.
आपल्या राजकीय वनवासाला शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोघेच जबाबदार असल्याचा राग शहाजीबापूंच्या मनात आहे.
त्यामुळे पवारांवर टीका करणे बंद करा म्हणाल्यावर पवार काका पुतण्याने वीस वर्षे मला घरात डांबून ठेवले आणि
आता मला त्यांच्यावर बोलू नका असं हा म्हणतोय, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टोलेबाजी केली.

Web Title :- MLA Shahajibapu Patil | shivsena rebel mla shahaji patil criticizes ncp sharad pawar and ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा