MLA Siddharth Shirole On Pune University Chowk Traffic | विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Siddharth Shirole On Pune University Chowk Traffic | विद्यापीठ चौकातील नियोजित मेट्रो उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथे वाहनचालकांसाठी सध्याच्या मार्गासोबत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दीनुसार वाहतूक नियोजनावर भर देण्याचे ठरले. (MLA Siddharth Shirole On Pune University Chowk Traffic)

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल व परिसरातील वाहतूक विषयक विविध समस्या सोडविण्याकरिता स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयामध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱयांची बैठक काल दिनांक ११ सप्टेंबर ला बोलावली होती. उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून तो सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. (MLA Siddharth Shirole On Pune University Chowk Traffic)

उड्डाणपूलाचे काम गतीने करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची सुद्धा यावेळी चर्चा झाली. नागरिकांनी केलेल्या विविध सूचनांही यावेळी विचारात घेण्यात आल्या.

पीएमआरडीए महानगर आयुक्त श्री. राहुल महिवाल, श्री. विवेक खरवडकर, पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त
श्री. विजयकुमार मगर, पुणे मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे
प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी चौक, नियोजित पर्यायी मार्ग यांची जागा पाहणी केली.
चौकात बाणेरच्या बाजूला सध्या सुरू असलेल्या खांबांचे काम लवकर केल्यास, औधच्या बाजूला पुलाचा रॅम्प
बांधण्यास परवानगी देण्याचे वाहतूक पोलिसांनी मान्य केेले. त्यामुळे, 15 ऑक्टोबरनंतर ते काम सुरू होईल.
महापालिकेच्या अधिकाऱयांनीही रस्ता रुंदीकरण जलद गतीने करण्याचे मान्य केले.
विद्यापीठाच्या आवारातून रेंजहिल्सकडे जाण्यासाठी दुचाकी वाहनांना स्वतंत्र मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला,
असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. यावेळी पीएमआरडीए महानगर आयुक्त श्री. राहुल महिवाल, श्री. विवेक खरवडकर,
पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. विजयकुमार मगर, पुणे मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे अधिकारी आदि उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली

Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले