आमदार पुत्राच्या कारने मुलीला उडवले जमावाने बीएमडब्लू पेटवली

पणजी : वृत्तसंस्था 

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बेळगावजवळ गोव्यातील हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाच्या भरधाव कारने धडक दिल्याने पादचारी तरुणी जागीच ठार झाली. तर आणखी एक तरुणी जखमी झाली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने बीएमडब्ल्यु कारवर दगडफेक करुन ती पेटवून दिली. हा अपघात बेळगावजवळच्या आझादनगर जवळील फ्रुट मार्केटजवळ सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ede5aff-cb77-11e8-993e-ff55f0e69e46′]

तैनीयत वाहिद बिस्ती (वय १८) असे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तैनीयत ही मूळची बिस्ती गल्ली, कॅम्प, गोवा येथील राहणारी होती. सध्या आझादनगर तिसऱ्या क्रॉसजवळ तिचे वास्तव्य होते. तर या अपघातात सम्रीन खालीद बिस्ती (वय 20, रा. कॅम्प) ही तरुणी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इंदापूर काॅलेजमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशी मारून जीवे मारण्याचा गावगुंडाचा प्रयत्न

हा अपघात जीए ०३ झेड ०६७८ क्रमांकाच्या कारने ठोकरल्याने  घडला. ही कार हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाची आहे. ही बीएमडब्ल्यू कार बंगळुरुहून बेळगावमार्गे गोव्याला जात होती. फ्रूटमार्केटजवळ पादचारी तरुणींना कारची धडक बसून, तैनीयत जागीच ठार झाली. या अपघातानंतर जमाव संतप्त झाला. अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारवर दगडफेक करुन, कार पेटविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी काईल ग्लेनसोजा टिकलो (वय २७, रा. कळंगुट, गोवा) या तरुण उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्यातील अनेक आमदारांची प्रकरणे नेहमीच गाजत असतात. आता आमदार पुत्रांच्या अशा कृत्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B07646G846′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’269202f5-cb77-11e8-a340-8b689169cadb’]