MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा सूचक इशारा, ”भाजपाला ईडीचं राजकारण भविष्यात परवडणार नाही, सत्तेचा…”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन- देशभरात केंद्रीय तपास यंत्रणाकडून ज्या कारवाया सुरू आहेत. ते पाहता हे राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही, असे दिसते, असा सूचक इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दिला आहे. ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, तसेच महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि इतर राज्यात अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे, यावर ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे म्हणाले, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेले नसते. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल, तेव्हा पलीकडच्या बाजूनेही दामदुपटीने कारवाई होईल, तेव्हा काय कराल? इंदिरा गांधींच्या काळातही असेच झाले होते, पण त्या काळात झाले म्हणून आपणही तेच करायचे, हे योग्य नाही.

रणजीत सावरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहीजेत. कुणीतरी गोडसेवर बोलायचे, मग पलीकडून नेहरू, इंदिरा गांधींवर बोलले जाणार. त्यापेक्षा कामावर लक्ष दिले पाहीजे. गोडसे गेले, गांधीही गेले.. त्यांच्यावर आज बोलून उपयोग नाही. महागाई, पेटड्ढोल-डिझेलच्या सेसवर कुणी बोलायला तयार नाही. मग गेलेल्या माणसावर बोलून हाती काय लागणार आहे? असा सवाल ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचा सवाल, ”आनंद व्यक्त केला, मग परत उपोषणाची वेळ का आली?”

MNS Chief Raj Thackeray | २०२४ मध्ये पंतप्रधानपदी कोण असावे? राज ठाकरेंनी दिले खास शैलीत उत्तर, ”यासाठी चाचपणी…”

Sharad Mohol Murder Case | ‘विठ्ठल शेलार, गणेश मारणेकडून जीवाला धोका’; शरद मोहळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुक भाजपला ‘जड’ जाणार? इच्छुकांच्या पाठीशी संघटना विभागल्याचे परिणाम शहर भाजपला भोगावे लागणार!