MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचे धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून अदानी, महायुती सरकार आणि ठाकरे गटावर टीकास्त्र

मुंबई : MNS Chief Raj Thackeray | धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (Dharavi Redevelopment Project) काम भाजपाचे (BJP) निकटवर्तीय उद्योगपती अदानी (Gautam Adani) यांना देण्यात आले आहे. या प्रकल्पात काही त्रुटी दाखवत शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) नुकताच मुंबईत मोर्चा देखील काढला होता. या प्रकल्पावरून आता राजकारण तापत चालले आहे. त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अदानी समूह, महायुती सरकार आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

अदानी समुह आणि महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, इतका मोठा प्रकल्प मुंबईत येत आहे. तो मुळात परस्पर अदाणींना का दिला? इथपासून सगळे सुरू होत आहे. अदाणींकडे असे काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथे नेमकं काय होणार ते कळायला पाहिजे होते. पण ते झाले नाही.

अदानी समुहाचा समाचार घेताना राज ठाकरे पुढे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी एक मोकळी जागा लागते.
खूप मोठा भाग आहे तो. तिथे किती शाळा, कॉलेजेस होणार? रस्ते कसे होणार? इमारतींमध्ये राहणारी माणसे किती असतील?
किती इमारती होणार? कोणकोणत्या संस्था येणार? हे सगळे सांगावे लागते. टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट
सांगावी लागते की नाही? कि फक्त एखादा भाग घ्यायचा आणि सांगायचे की हा अदाणींना देऊन टाकला.
असं असतं का, असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले. (MNS Chief Raj Thackeray)

तर ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आता
महाविकास आघाडीच्या नेत्यांना का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले असतील.
मग आज मोर्चा का काढला? सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून का?

राज ठाकरे म्हणाले, हे मोर्चा काढणारे ८ ते १० महिन्यांनी जागे झालेत. यांनी हा प्रश्न विचारला का की नेमकं काय होणार
आहे तिकडे? की फक्त मोर्चा काढून दबाव आणून सेटलमेंट करायच्या आहेत?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश