MNS Chief Raj Thackeray | मदतीसाठी सगळे येतात, मग मतदानाच्यावेळी कुठे जातात?, मनसे प्रमुख राज ठाकरेंचा परखड सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन रविवारी (दि.11) मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात झाला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) उपस्थित होते. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी नाशिकमध्ये प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांबरोबर घडलेला किस्सा सांगत त्याची कारणं सांगितली. यावेळी त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) वंदन करायला गेलेले असतानाचा घडलेला एक प्रसंग सांगितला.

 

राज ठाकरे म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर (Fort Raigad) गेलो होतो. गडावरुन खाली आलो तेव्हा गाडीत बसताना चार-पाच जण आले. त्यांनी चिपळूण वरून आल्याचे सांगितले. गेल्यावर्षी कोकणात पुरामुळे नुकसान झालं तेव्हा केवळ मनसेचे कार्यकर्ते मदतीला धावले, इतर कुणीही नाही, असं त्यांनी सांगितलं. बरं झालं भेटलात, कधीतरी आभार मानायचे होते, ते आज मानून टाकतो, असं त्या लोकांनी सांगितले.

सगळ्या प्रसंगात आपण सगळीकडे धाऊन जातो. सगळीकडे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात.
मला प्रश्न पडतो, हे मतदानाच्यावेळी कुठे जातात. नाशिकला मला अनेक शेतकरी भेटायला आले.
ते मला अनेक प्रश्न सांगत होते. मी त्यांना त्यांच्या भागातील खासदार, आमदार कोण विचारलं,
जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे विचारलं. त्यांनी त्या त्या पक्षांची नावे सांगितली.
त्यावर जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल, तर मग माझ्याकडे येता कशाला,
असं मी विचारलं, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

 

Web Title :  MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray tell why he question farmers from nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा