MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेच्या बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर मनसे कामाला लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शस्त्रक्रियेनंतर मनसे नेत्यांची बैठक घेतली. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रवींद्र नाट्य मंदिरात (Ravindra Natya Mandir) पार पडला. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) हे भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरु झाली. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना असणार आहे.

 

आज झालेल्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai), अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar), संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे नेते उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सर्वांशी चर्चा केली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना माहिती दिली. पक्षाची आज महत्वाची बैठक होती. उद्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत. राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

 

राज ठाकरे दौरा करणार
मनसेचे नेते आधी राज्यात दौरा करणार आहेत, त्यानंतर राज ठाकरे स्वत: दौरा करणार आहेत. पक्ष संघटना, आगामी निवडणुका यावर आज चर्चा झाली. उद्या सविस्तर भूमिका मांडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत राज ठाकरे स्वत:च बोलतील. यावर बोलणं उचित राहणार नाही, असंही नांदगावकर म्हणाले. पक्ष वाढला पाहिजे, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जा, अशी सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली.

त्यांची साद आधी येऊ द्या…
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आज सूचक विधान केले आहे.
उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
अशा प्रकारचे वक्तव्य करुन त्यांनी ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिले.
यावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे उत्तर देतात हे पहावे लागेल.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns leader bala nandgaonkar on will raj thackeray and uddhav thackeray come together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Minor Girl Gang Rape in Pune | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढत नेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 

Ajit Pawar | सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

 

Pune Crime | पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्यास भाग पडले