Minor Girl Gang Rape in Pune | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढत नेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Minor Girl Gang Rape in Pune | पुणे शहर आणि जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदवस वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor Girl Gang Rape in Pune) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा (FIR) दाखल करुन मुख्य आरोपीला बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत.

 

ही घटना शनिवारी घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध आयपीसी 376 सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Rural Police) मुख्य आरोपी राहुल हनुमंत जाधव (Rahul Hanumant Jadhav) याला अटक (Arrest) केली आहे तर दोन जण फरार आहेत.

 

शनिवारी सकाळी अकराच्या सुमारस आरोपी राहुल हनुमंत जाधव याने पीडितेला मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढत नेले.
त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमिनी मधून आलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांपैकी एकाने पीडितेवर जबरदस्ती केली.
या दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. यानंतर आरोपी पीडित मुलीला गाडीमधून इंदापूर रोडवरील एका घरात घेऊन गेले.
काही वेळानंतर त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले. पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Baramati Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) करीत आहेत.

 

Web Title :-  gang rape on minor girl in indapur taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supreme Court | शिंदे-फडणवीस सरकारला ‘सुप्रीम’ दणका, BMC वॉर्ड फेरबदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश;

 

Vinayak Mete Accident | अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिल्या ‘या’ 2 महत्वपूर्ण सूचना, गृहमंत्र्यांनी दिलं आश्वासन

 

Tomato Fever In India | वेगाने पसरत आहे Tomato Fever, जाणून घ्या लक्षणे? या लोकांना आहे धोका