MNS Chief Raj Thackeray | निवडणुकांसाठी शिवतीर्थावर महत्वाची बैठक, राज ठाकरेंचे नेत्यांना आदेश, ”आरक्षणाच्या वादात…”

मुंबई : MNS Chief Raj Thackeray | येत्या काही दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू. तसेच लोकसभेसह इतर निवडणुका (Lok Sabha Elections 2024) आहेत, त्यासाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी नेते आणि पदाधिकारी यांना दिले. आज त्यांच्या शिवतीर्थ (Shivtirtha) निवासस्थानी बैठक झाली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

या बैठकीत आगामी निवडणुका आणि मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservations) वादावर चर्चा झाली. यावेळी, आरक्षणाच्या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नये, अशी सूचना राज ठाकरेंनी सर्वांना दिली.

तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना मुदत दिली आहे. ज्या दुकानदारांनी अद्याप पाट्या बदलल्या नसतील त्यांना आठवण करून द्या, असेही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित करताना म्हटले होते की,
मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असे बोललो होतो.

परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायची असे आहे का?
कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही.
त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच, असे ठाकरे यांनी म्हटले होते.

अशा अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोकांना त्यांच्या समस्या डोक्यात येता कामा नये.
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात, असे ठाकरे म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आमदार अपात्रता प्रकरण : शिंदेंच्या वकिलांनी प्रश्नांचा भडीमार करत सुनील प्रभूंना घेरलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?