MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे व मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये काय झाली नक्की चर्चा? प्रतिक्रिया आली समोर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्लाने राज्याचे राजकारण तापले आहे. विरोधकांनी गृह खाते व सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मराठा आंदोलनकर्त्यांचे अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू असून आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) हे उपोषणाला बसले आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली असून त्यांची बाजू सक्षमपणे मांडण्याची ग्वाही दिली आहे.

शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जरांगे यांची भेट घेतली असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देखील आज (दि.04) जालना येथे जाऊन आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली असून मनोज जरांगे यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी लाठीमार केला त्यांना मराठवाडा येण्यास बंदी करा. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे फिरकू देवू नका असे देखील राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे. राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांच्यामध्ये झालेली बोलणी सांगितली आहे.

जालना (Jalna Aandolan) येथे राज ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी त्या दोघांमध्ये झालेली चर्चा यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी सांगितले की आधी राज ठाकरेंचा संभ्रम झाला होता. जरांगे पुढे म्हणाले की,“सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित प्रकरणामुळे आरक्षण मिळू शकत नाही असा राज ठाकरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. त्यांचा अर्थ होता की तुम्हाला फक्त झुलवत ठेवतील. त्यांचं बरोबर आहे. पण आमची मागणी सर्वोच्च न्यायालयातल्या आरक्षणाची नाही” असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

उपोषणकर्त मनोज जरांगे यांनी आपले मत राज ठाकरे यांच्या समोर मांडून आपली मागणी देखील स्पष्ट केली आहे.
जरांगे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर वर्षभराने आम्ही अखंड महाराष्ट्रात सहभागी झालो.
त्याआधी आम्हाला आरक्षण होतं. त्यासाठी हा लढा आहे.
आम्ही नेमकं कोणतं आरक्षण मागतोय हे राज ठाकरेंना सांगितल्यानंतर ते सकारात्मक झाले.
सर्वोच्च न्यायालयातल्या प्रलंबित आरक्षणासाठी आमची मागणी नाही.
मराठवाडा वर्षभरानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला. हैदराबाद संस्थानात असताना आम्हाला आरक्षण होतं.
आम्हाला ते आरक्षण लागू केलं नाही ही आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितली आहे.”

जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, “सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही.
मराठ्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेत म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे.
मराठवाड्याच्या (Marathwada) जालन्यातील काही तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत.
गिरीश महाजन म्हणाले की जीआर काढण्यासाठी आम्हाला पुरावा पाहिजे. समितीला आज पुरावे मिळाले आहेत.
हे देखील आम्ही राज ठाकरेंना सांगितलं. राज ठाकरेंनी आमच्याकडून काही टिप्स लिहून घेतल्या.
तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवतो. कारण हा विषय मलाच माहिती नाही,
त्यामुळे मी तुम्हाला काही खोटं सांगत नाही.” असे मनोज जरांगे यांनी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)
यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माध्यमांना सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ