MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker On Mosque) विषयावरुन राज्यात वादंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सध्या आक्रमक होताना दिसत आहे. मशिदींवरील भोंगे उतरवा असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (Non – Bailable Warrant) काढलं आहे. सांगलीतील शिराळा कोर्टाने (Shirala Court) हे अजामीनपात्र वॉरंट काढले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

2008 साली राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले आहे. दरम्यान, 6 एप्रिल रोजी हे वॉरंट काढण्यात आलं. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. “सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 5 ते 10 वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवलं असल्याचे शिराळा कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

2008 साली राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी काही भडकाऊ वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं. राज ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीमधील शिराळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते. या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता.

 

दरम्यान, ही प्रकरणे आतापर्यंत मार्गी लागणं आवश्यक होते. परंतु, अजुन कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते.
त्याआधीच आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | shirala court issues non bailable warrant against mns president raj thackeray sangli news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा