MNS MLA Raju Patil | म्हाडा सोडतीत कथित गैरव्यवहार प्रकरणात मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – म्हाडा इमारतीतील (MHADA building) सोडतीत घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. प्रदीप झेंडे यांनी दिली आहे. राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात कल्याण न्यायालयात (kalyan court) हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे अ‍ॅड. झेंडे यांनी सांगितले.

कल्याण मतदारसंघातील (kalyan constituency) मौजे खोणी येथे असलेल्या म्हाडा इमारतीच्या सोडतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. तसेच याची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी म्हाडाकडे केली होती. परंतु म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप झाला नसून मानवी हस्तक्षेप करण्यास वाव नसल्याचे सांगितले.

तसेच म्हाडाच्या वरिष्ठ लिपीक छाया राठोड (chhaya rathod) यांच्या नातेवाईकांनी सर्व अटी-नियमांची पूर्तता करुन सदनिकांचा ताबा घेतल्याचे चौकशीत स्पष्ट करत ही तक्रार निकाली काढली, असे अ‍ॅड. प्रदीप झेंडे यांनी सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी नाहक बदनामी केल्याचे सांगत कल्याण न्यायालयात त्यांच्याविरोधात फौजदारी दावा (Criminal claim) केल्याचे, अ‍ॅड. प्रदीप झेंडे (Adv. Pradeep Zende) यांनी सांगितले आहे.

Web Title : claim of defamation suit against mla raju patil for alleged misconduct in mhada draw

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे