MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण लोकसभेच्या (Kalyan Lok Sabha Constituency) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivena) धूसफूस सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावरुन मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी भाजप-शिवसेनेला चिमटा काढला आहे. नागरिकांच्या समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप शिंदे गटाची ही खेळी आहे. युती शंभर टक्के होणार आहे. कल्याण लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार राहणार आणि ही मंडळी पुन्हा एकत्रीत काम करणार, असं पाटील म्हणाले. राजू पाटील (MNS MLA Raju Patil) डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात मनसे पदाधिकाऱ्यांच्या आयोजित प्रशिक्षण शिबीरात बोलत होते.

ही मंडळी एकाच थाळीचे चट्टेबट्टे

राज्य सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच होणार आहे. या विस्तारात विद्यमान पाच मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. तसेच यासाठी भाजपचा दबाव असल्याचे बोलले जात आहे. यावर आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या सर्व राजकीय सर्व्हेक्षणात शिंदे गटाला कमी स्थान दिले आहे. जनसामान्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरीता चाललेली ही राजकीय खेळी आहे. 2015 साली कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप भांडत होते. त्यानंतर पुन्हा युती केली. ही मंडळी एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत.

भाजप शिवसेनेच्या खासदाराचा प्रचार करणार

राजू पाटील पुढे म्हणाले, एका पोलीस अधिकाऱ्यावरुन एवढे राजकारण करण्याची गरज नाही. गृह खाते भाजपकडे आहे.
अधिकाऱ्याची बदली करायची झाली तर ते लगेच करु शकतात.
मात्र, त्यावरुन सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने मंजूर करणे, त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे
(MP Shrikant Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी असल्याचे सांगणे हा सगळा प्रकार नागरिकांच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा आहे. ते निवडणूकीत शंभर टक्के युती करणार. कल्याणमधून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार हे पक्के आहे. शिवसेनेच्या खासदाराचा प्रचार भाजप करणार असे पाटील यांनी म्हटले.

Web Title : MNS MLA Raju Patil | ‘This is BJP Shinde group’s ploy’, MNS takes a swipe at the Kalyan Lok Sabha seat dispute; Said – ‘This church again…’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Pune PMC News – G20 Summit | G 20 परिषदेसाठीच्या ‘विद्युत रोषणाई’च्या कामांत नियमांचे उल्लंघन ! निविदा भरण्यापुर्वीच मर्जीतील ठेकेदारांकडून लाखोंच्या कामांचा सपाटा

Maharashtra Politics News | जागा वापटाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान, म्हणाले – ‘जागा वाटपाचा निर्णय…’