MNS | मनसेचा आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या (Bombay Municipal Corporation) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चांगली अलर्ट झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी काही दिवसापूर्वीच कोकण दौरा केला आहे. आता ते मुंबईत मनसेच्या (MNS) विद्यार्थी सेनेची बांधणी वेगाने करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना (Shivsena) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यात निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपा नेते (BJP Leader) सातत्याने आदित्य यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. आता मनसेच्या विद्यार्थी सेनेने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 

मनसेचे (MNS) सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील 30 महाविद्यालयांमध्ये मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे युनिट अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. हे पाहून आता युवासेना देखील अधिक सक्रिय झाल्याची टीका मनसेने केली आहे.

 

मनविसे युनिटचे उद्घाटन झाल्यानंतर कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटले की,
शिवसैनिकांच्या निष्ठा तपासण्यासाठी रक्त तपासणी करणारे Pathologist आदित्य ठाकरे जागे झाले आहेत.
पश्चिम उपनगरातील पाटकर किंवा निर्मल, गोखले महाविद्यालयांत आता शिवसेनेचा, युवासेनेचा बोर्ड लावून काहीही फायदा होणार नाही, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं.
या महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींची मनं अमितसाहेबांनी कधीच जिंकली आहेत.

 

वरुण सरदेसाई यांच्यावर टीका करताना शिंदे यांनी म्हटले की, ‘वरून’ आलेल्या सरदेसाईच्या माहितीसाठी, मनविसेची मुंबईतील 100 महाविद्यालय युनिट्स सज्ज आहेत.
अक्षरश: हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनविसेत सक्रिय काम करण्यासाठी अर्ज भरले आहेत.
आज चांदिवलीत तीन महाविद्यालयांत आमचा शानदार युनिट उदघाटन सोहळा आहे.

 

शिंदे यांनी पुढे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातील ’प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट’ हा उपक्रम अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही राबवत आहोत.
अमितसाहेबांच्या मनविसेचा नाद करू नका.
मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, संभाजीनगर, नागपूर, मनविसेची युनिट्स सर्वत्र स्थापन होत आहेत.

 

Web Title : – MNS | mns leader criticizes aditya thackeray and varun sardesai over yuvasena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा