MNS | मनसे टेलिकॉम सेनेचा मोठा विजय ! स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 16 ऑक्टोबर पासून सुरु ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक मराठीतही प्रक्षेपित का करत नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) काही दिवसांपूर्वी आंदोलन (Agitation) पुकारले होते. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना (Maharashtra Navnirman Telecom Sena) आज, शुक्रवारी 14 ऑक्टोबरला आंदोलन करणार होती मात्र त्याअगोदरच स्टार स्पोर्ट्सचे (Star Sport) अधिकारी विश्वचषक मराठी प्रक्षेपणाच्या संदर्भात उद्या मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत.

मुंबईकरांच्या नसानसात क्रिकेट (Cricket) भिनले आहे, महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षक विश्वचषकासाठी स्टार स्पोर्ट्स पाहणार आहेत.
जर स्टार स्पोर्ट्स इतर प्रादेशिक भाषांना महत्त्व देऊ शकते तर मराठीलाच दुय्यम वागणूक का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे (MNS) अध्यक्ष सतीश नारकर (Satish Narkar) यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. तसेच अन्य भाषांबाबत आम्हाला आक्षेप नाही मात्र मराठीलाही योग्य स्थान द्यावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती.

 

त्यामुळे आता स्टार स्पोर्ट्सच्या वतीने पुढाकार घेऊन चर्चेची तयार दाखवण्यात आली आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
तसेच काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डीचे (Pro Kabaddi) प्रक्षेपणही मराठीत करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती.
त्यामुळे आता टी – 20 विश्वचषकही मराठीत दाखवण्याच्या मागणीला स्टार स्पोर्ट्स तयार होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- MNS | t20 world cup in marathi star sports executives to meet mns leader raj thackeray at shiv tirtha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | हे दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ आहेत का? – सुषमा अंधारेंचा मोठा प्रश्न

 Amit Thackeray | अमित ठाकरे देखील ठेवणार आदित्य यांच्या पावलावर पाऊल, महाराष्ट्र दौर्‍यावर असताना दिले संकेत

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा