Sushma Andhare | हे दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ आहेत का? – सुषमा अंधारेंचा मोठा प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhab Balasaheb Thackeray) गटाची महा प्रबोधन यात्रा सुरु आहे. या यात्रेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते आणि मंडळी सहभागी होत, आपले विचार जनतेपर्यंत पोहचवत आहेत. सेनेच्या गटनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आदी लोक या यात्रेत सहभागी झाले आहे. यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर निशाणा साधला आहे.

 

ठाण्यात शिवसेनेच्या एका जाहीर सभेतील एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा हवाला देत त्यांनी शिंदे यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक जुना व्हिडीओ उपस्थितांना दाखविला. या व्हिडीओत ठाणे जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या लोकांवर कशा प्रकारे अन्याय करत आहेत, हे सांगताना दिसत आहेत. तसेच त्यांनी या जाहीर सभेत आपल्या ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाचा राजीनामा देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

त्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे दादा कोण आहेत,
एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ तर नाहीत ना? यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
लोक डोक्याला गोड तेल लावत नाहीत. त्यांना राजकारण कळते, असे म्हणत अंधारे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
यावेळी अंधारेंनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा देखील समाचार घेतला. मी टपरीवाला होतो,
असे पाटील नेहमी सांगत असतात. मला बाळासाहेबांनी मोठे केले. मी टपरीवाल्यापासून मंत्रिपदावर देखील गेलो,
असे देखील ते सांगतात. पण ज्यावेळी त्यांची भाषा बदलते, तेव्हा त्यांना कसे काय सांगायचे हा प्रश्न पडतो.
ते टपरी भाषा का वापरतात, असा प्रश्न अंधारे यांनी पाटलांना विचारला.

 

Web Title :- Sushma Andhare | so is he eknath shindes twin brother sushma andharens harsh criticism of cm and gula rao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन

Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ