सावधान ! ‘क्रेडिट कार्ड’ संबंधित ‘हा’ मेसेज करेल तुमच्या बँक खात्यातील पैसे ‘गायब’, जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल आणि तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स संबंधित मेसेज आला तर जरा सावधच रहा. कारण हे सायबर चोरट्यांचे तुमच्यासाठी आखलेले जाळे असू शकते. जर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्स संबंधित कोणताही मेसेज आला तर त्याची पडताळणी करुन मगच तुमच्या बँक अकाऊंटचा तपशील द्या. अनेक लोकांना क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स पॉइंट रिडीम करण्यासंबंधित मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ३२ वर्षीय भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लोकांची फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीचे नाव विकास झा आहे. त्यांच्याकडून अनेकांना गंडा घालण्यासाठी क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स घेण्यासंबंधित मेसेज पाठवण्यात येत होते. ज्यातून त्याला लोकांचे बँक डिटेल्स चोरता येत होते. झा हा याआधी एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा. आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याने नोकरी सोडली. ज्यावेळी व्यवसायात त्याला अपयश यायला लागले तेव्हा त्याने लोकांना फसवण्याचा धंदा सुरु केला.
असा मेसेज आल्यास सावधान –
काही सिम कार्ड वेंडर्सला जोडीला घेऊन असे काम करण्यास सुरुवात केली होती, यासाठी त्यांने लोकांना पाठवण्यासाठी मेसेज तयार केला होता. त्या लिहिले होते की, तुमच्या क्रेडिट कार्डवर खूप जास्त रिवॉर्ड्स पॉइंट्स तयार झाले आहेत. यांचा उपयोग तुम्ही कॅशबॅक ऑफर्स किंवा सवलती मिळवण्यासाठी करु शकता. रिवॉर्ड पॉइंट्स संपवण्यासाठी एसएमएस मध्ये दिलेल्या लिंकलर क्लिक करा आणि एक अर्ज भरा, या लिंकवर क्लिक करताच kotekcardredeem.com या बनावट वेबसाइटवर लोक पोहचत असत.
लोकांची माहिती, क्रेडिट कार्ड वरील CCV नंबर यासंबंधित तो ही माहिती लोकांकडून काढून घेत असत, अशा प्रकारे ई-वॉलेट्सचा वापर करुन विकास झा याने आपल्या साथीदारांसह लोकांना फसवले होते. पोलिसांनी या चोरट्यांकडून ४- ५ लाख रुपये रोख रक्कम, ९ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, एक राऊटर आणि ४० सिम कार्ड जप्त केले.
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे
- गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी
- गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या