Mobile theft in Pune | दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकाविणार्‍याला कोरेगाव पार्क पोलिसांकडून काही तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णालयाच्या गेटमधून दुचाकीवर येऊन जबरदस्तीने मोबाईल (Mobile theft in Pune) पळविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोरेगाव पार्क पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल (Mobile theft in Pune), दुचाकी जप्त केली आहे.

नोएल अलन शबान (वय 22, रा. साधू वासवानी ब्रिज खाली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दीपक फुलकर (वय 43) यांनी तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी फिर्यादी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून जात होते.

ते जहांगीर रुग्णालयाच्या पार्किंग गेटसमोर आल्यानंतर अचानक एकजण पाठीमागून दुचाकीवर जवळ आला आणि त्याने फिर्यादी यांचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला होता.

त्यांनी आरडाओरडा केला व घटनेची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना दिली.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी चोरटा बर्नीग घाट रोडवर त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून दुचाकी आणि इतर ऐवज जप्त केला आहे.

शबान Shaban हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीचे 9 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे आणखी तपास करण्यात येत असून त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलीस हवालदार दिनेश शिंदे, पोलीस नाईक गणेश गायकवाड, निशिकांत सावंत, रियाज शेख आणि अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Also Read This : 

 

Baba Ramdev & Corona Vaccine : कोरोना प्रतिबंध लस घेणार का? बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर

 

घरच्या घरी पार्लर ट्रीटमेंटसारखी चमक मिळवा, खुपच कमालीचा आहे हा DIY फेस पॅक

 

Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

 

मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या

 

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार

 

शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार

 

मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या

 

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय