‘पेटीएम’ आणि ‘गुगल-पे’च्या KYC साठी आधारकार्ड गरजेचं नाही ; मोबाईलधारकांचा ‘जीव’ भांड्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर मोबाईल वॉलेट कंपन्या म्हणजेच पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या कंपन्यांना आता दिलासा मिळणार आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होणार आहे कारण ग्राहकांकडे या पुढे या वॉलेट कंपन्यांच्या केवायसीसाठी आधार कार्डची मागणी केली जाणार नाही. याआधी ग्राहकांना मोबाईलच वॉलेटचा वापर करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक होते. यात आधार कार्डचे असणे आवश्यक होते. आधार कार्डने केवायसी करताना कंपन्यांना ग्राहकांना मॅन्युअली वेरिफाय करणे शक्य नव्हते. यात कंपन्यांना बराच पैसा खर्च करावा लागत होता.

परंतू आता या निर्णयानंतर मोबाईल वॉलेट कंपन्यांची समस्या संपणार आहे, कारण आता ग्राहकाच्या आधारकार्डची सत्यता पाहण्याची गरज भासणार नाही.

आधार शिवाय सेवा
या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीकडे सत्यता तपासणीसाठी आधारकार्ड नसेल तर त्याला सेवा देण्यापासून अडवता येणार नाही. आधार कार्ड धारक व्यक्ती QR कोडच्या आधारे ऑफलाइन वेरिफिकेशन करु शकतात. असे असले तरी मिनिमम केवायसी पुर्ण करण्यासाठी आरबीआयकडून मोबाईल वॉलेट कंपन्यांना ऑगस्ट २०१९ पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. आता मिनिमम केवायसी फुल केवायसीमध्ये बदलण्यासाठी त्यांना १८ महिन्यांची डेडलाइन देण्यात आली आहे.

मोबाईल वॉलेट कंपन्यांना होणार फायदा
मोबाईल वॉलेट कंपन्यांना मॅन्युअली एक केवायसी पूर्ण करण्यासाठी २०० ते २५० रुपये खर्च येतो. त्यांना त्यासाठी लॉजिस्टिक्स आणि मॅन्युअल वेरिफिकेशन सेंटर उघडावे लागते. ज्या मोबाईल वॉलेट कंपन्याचे ग्राहक आधिक आहेत त्यामुळे त्यांचा खर्च आधिक आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या महसूलावर होत होता.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

You might also like