मतदान करण्यासाठी आपल्या शहरात जाण्याची नाही आवश्यकता, रिमोट वोटिंगवर EC करत आहे काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोग मतदानाची प्रक्रिया अजून सोपी आणि टेकसॅव्ही बनवण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. सोमवारी 11व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले की, रिमोट वोटिंगच्या सुविधेसाठी लवकरच मॉक ट्रायल सुरू केली जाईल. रिमोट वोटिंगचा अर्थ मतदानाची अशी सुविधा जिथे एका शहरातील मतदार दुसर्‍या शहरात आपले मत टाकू शकतो. निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले की, तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंगच्या दिशेने प्राजेक्टवर काम केले जात आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले, या बाबत चांगली प्रगती झाली आहे, आणि लवकरच मॉक ट्रायल सुरू केली जाईल. रिपोर्टनुसार, निवडणूक आयोग रिमोट वोटिंगसाठी आयआयटी मद्राससोबत नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहे. याद्वारे मतदार आपल्या मतदान केंद्रात न जाता दूरच्या आपल्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघासाठी मतदान करू शकतील.

असे समजून घ्या पूर्ण तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानाचे नाव ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे. माजी सीनियर डेप्युटी कमिश्नर यांनी ही प्रक्रिया सविस्तर समजावली. त्यांनी म्हटले की, समजा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे आणि चेन्नईचा एक मतदार दिल्लीत आहे. तर त्यास मतदान करण्यासाठी चेन्नईतील आपल्या मतदान केंद्रावर जाण्याऐवजी मतदार दिल्लीतच निवडणूक आयोगाद्वारे ठरवलेल्या एका ठिकाणी, जसे की कनॉट प्लेसवर जाऊन आपले मत देऊ शकतो. यासाठी त्याला एक खास वेळ घ्यावी लागेल आणि या पर्यायाचा वापर करण्यापूर्वी त्यास निवडणूक अधिकार्‍याला अगोदरच अर्ज द्यावा लागेल.

माजी सीनियर डेप्युटी इलेक्शन कमिश्नर संदीप सक्सेना म्हणाले की, ही एक टू वे इलेक्ट्रानिक वोटिंग सिस्टम असेल, ज्यासाठी व्हाइट लिस्टेड इंटरनेट प्रोव्हायडर डिव्हाइसचा वापर केला जाईल. यासाठी विशेष इंटरनेट लाईन्सचा वापर केला जाईल, या तंत्रज्ञानात बायोमेट्रिक डिव्हाइस आणि वेब कॅमेर्‍याचा सुद्धा वापर होईल. म्हणजे मतदानादरम्यान निवडणूक आयोगाची नजर मतदारावर असेल.

याचा अर्थ घरातून मतदान नाही
त्यांनी म्हटले की, या प्रक्रियेचा अर्थ घरातून मतदान नाही. यासाठी मतदाराला एका ठरवलेल्या ठिकाणी आणि वेळी पोहचावे लागेल.

सिस्टममधून ई बॅलेट पेपर होईल जेनरेट
येथे मतदारांची ओळख सिस्टमद्वारे पडताळली जाईल. यानंतर सिस्टमद्वारे एक पर्सनलाइज्ड ई बॅलेट पेपर जेनेरेट केला जाईल. जेव्हा मतदार वोट देईल तेव्हा हा बॅलेट पेपर इनक्रिप्ट म्हणजे लॉक केला जाईल आणि एक हॅशटॅग क्रिएट केला जाईल.

याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांनी हे सुद्धा सांगितले की, निवडणूक आयोग ओव्हरसीज इंडियन मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा देण्यावर विचारत करत आहे. याबाबत प्रस्ताव बनवून आयोगाने कायदा मंत्रालयाला पाठवला आहे, मंत्रालयात हा प्रस्ताव विचाराधीन आहे.