Modi Cabinet Decisions | मोदी सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने लाखो लोकांना मिळेल रोजगार, जाणून घ्या प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Cabinet Decisions | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Modi Cabinet Decisions) आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारने टेक्सटाईल इंडस्ट्री (Textile Industry) साठी परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) साठी मंजुरी दिली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, टेक्सटाईल कंपन्यांना उत्पादनाच्या आधारावर 10,683 कोटी रुपये इन्सेन्टिव्ह म्हणून दिले जातील.

गोयल यांनी दावा केला की, यामुळे भारतीय कंपन्या जागतिक स्पर्धेत पुढे जातील.
यामध्ये टियर-3 आणि टियर-4 शहरांच्या जवळ असलेल्या कंपन्यांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल. टेक्सटाईल सेक्टरमध्ये रोजगाराव्या नव्या संधी तयार करण्यावर जोर दिला जाईल.

रोजगार आणि निर्यात वाढेल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी म्हटले की, टेक्सटाईल सेक्टरला पीएलआयच्या मंजूरीने 7 लाख लोकांसाठी नोकरीची संधी निर्माण होतील. तसेच निर्यात सुद्धा वाढेल.

सर्वात जास्त रोजगार टेक्सटाईल इंडस्ट्रीत

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, देशात सर्वात जास्त रोजगार टेक्सटाईल इंडस्ट्री देते.
आज अंतरराष्ट्रीय व्यापार्‍याचा दोन तृतीयांश बाजार मॅन मेड टेक्सटाईल आणि टेक्निकल टेक्सटाईलचा आहे. अशावेळी फॅब्रिक, गारमेंट्ससह संपूर्ण इकोसिस्टममध्ये भारताचे योगदान वाढवण्यासाठी टेक्सटाईल पीएलआयला मंजूरी दिली आहे.

13 सेक्टरसाठी पीएलआय योजना

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या हेतूने आतापर्यंत 13 सेक्टरसाठी पीएलआय योजनेची घोषणा केली गेली आहे.
कॅबिनेटकडून मंजूरी मिळाल्यानंतर आता वस्त्र मंत्रालय या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करेल.

 

MMF साठी 7000 कोटी तर TT साठी 4000 कोटीची PLI

कॅबिनेटने मॅनमेड फायबर (MMF) एप्रिलसाठी 7,000 कोटी रुपये आणि टेक्निकल टेक्सटाईल (TT) साठी 4,000 कोटी रुपयांच्या पीएलआयसाठी मंजूरी दिली आहे.
भारताच्या कापड निर्यातीत मॅन मेड फायबरचे योगदान अवघे 20 टक्के आहे.
तर, सध्या कॉटनचे योगदान 80 टक्के आहे.

या राज्यांना होईल थेट लाभ

जगातील इतर देश या बाबतीत भारताच्या खुप पुढे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या टेक्सटाइल पीएलआयसाठी मंजूरी देण्याने गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,
पंजाब, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि ओडिसाला थेट फायदा होईल.

 

Web Title : Modi Cabinet Decisions | big decision of the central government will give employment to lakhs of people employment news know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ravet Police Station | देहुरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन रावेत पोलीस स्टेशनच्या निर्मितीस शासनाची मंजुरी

Pune Court | नानासाहेब गायकवाडांच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जीव मारण्याची धमकी देत मर्सिडीज कार नावावर केल्याचं प्रकरण

WhatsApp वापरकर्त्यांना झटका ! फेसबुक पाहतंय तुमचे खासगी मेसेज? रिपोर्टमधून दावा