Modi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला अलर्ट, तात्काळ करा हे काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : Modi Government | सर्व अ‍ॅप्पल आयफोन, अँड्रॉईड मोबाइल फोन आणि विंडोज डिव्हाईस यूजर्ससाठी मोदी सरकारने (Modi Government) एक अलर्ट जारी केला आहे. नोडल सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने अ‍ॅप्पलचे सॉफ्टवेयर ईकोसिस्टम, गुगल अँड्रॉईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये कमतरतांबाबत इशारा दिला आहे.

या यूजर्सला सल्ला दिला जात आहे की, त्यांनी कोणत्याही स्थितीत हे टाळू नये. या कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टममधील कमतरतांचा फायदा घेत सायबर गुन्हेगार हे डिव्हाईस हॅक करू शकतात, यापासून वाचण्यासाठी अ‍ॅप्पल, विंडोज आणि अँड्रॉइड यूजर्सने आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे, असा सल्ला दिला जात आहे.

Android यूजर्ससाठी काय आहे सल्ला?

CERT-In नुसार, अँड्रॉईड डिव्हायसेसच्या सिग्नल अ‍ॅप्लिकेशनमध्ये कमतरता आढळली आहे. यामुळे काही फोटो आपोआप सेंड होतात. अशाप्रकारे यूजर्सची प्रायव्हसी सुद्धा लीक होऊ शकते. याबाबत एजन्सीने सल्ला दिला आहे की, गुगल प्ले स्टोअरवरून ताबडतोब Signal अ‍ॅपचे व्हर्जन 5.17.3 डाऊनलोड करा.

Apple यूजर्सने काय करावे?

सायबर सिक्युरिटी एजन्सीने iOS आणि iPadOS मध्ये कमतरता आढळली आहे, ज्यामुळे तुमचा
डिव्हाईस हॅकर्स कंट्रोल करू शकतात. या बगने 11.5.1 च्या पूर्वीच्या व्हर्जनवर चालणारे Apple
macOS Big Sur डिव्हाईसेस, iPhone 6s आणि नंतरचे डिव्हाईस, 14.7.1 च्या अगोदरच्या
व्हर्जनवर चालणारे Apple iOS आणि iPadOS डिव्हाईसेस, iPad Pro (सर्व मॉडल), iPad
Air 2 आणि नंतरचे डिव्हाईस, 5वी आणि त्यानंतरच्या जनरेशनचे iPad, iPad mini 4 आणि
नंतरचे डिव्हाईस, आणि iPod touch (7वे जनरेशन) ला प्रभावित केले आहे. अलिकडेच अ‍ॅप्पलने
यासंबंधी सिक्युरिटी अपडेट जारी केले आहेत.

हे देखील वाचा

LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Government alert for mobile users if you want to avoid trouble follow these steps

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update