‘स्पेस वॉर’चा धोका ओळखून मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आपल्या संरक्षणव्यवस्थेच्या संदर्भात भारताने एक महत्वपूर्ण निर्णय घेत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेनंतर आता भारतानेदेखील अंतराळदलाची निर्मिती करण्याच्या दिशेने तयारी सुरु केली आहे.

संरक्षण ‘अंतराळ संशोधन संस्था’ (डीएसआरओ) अशा नवीन संस्थेची स्थापना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली असून अंतराळ क्षेत्राशी संबंधित उच्च क्षमतेची हत्यारं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम हि संस्था करेल.

संरक्षण मंत्रालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये ही नवी संस्था स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे. डिफेंस स्पेस रिसर्च एजंसी (डीएसआरओ) नावाने ओळखली जाणाऱ्या या संस्थेकडे अंतराळ युद्धाच्या तयारीसाठी हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी असेल.

या संस्थेच्या स्थापनेसाठी एका जॉईंट सेक्रेटरीच्या दर्जाच्या वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली वेगाने हालचाली सुरु असून लवकरच एक वैज्ञानिकांचे पथक या संस्थेस मदतीसाठी पुरविले जाईल. ही संस्था ‘संरक्षण अंतराळ संस्थे’ला (डीसीए) ला संशोधन आणि विकासात मदत करेल. डीसीएमध्ये तीनही दलांचे सदस्य असून तिन्ही दलांना सोबत घेऊन अंतराळातील युद्धासाठी तयारीच्या मदतीसाठी हि संस्था स्थापन केली आहे.

अमेरिकेकडूनही याआधीच अंतराळ दलाची निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे. २०२० पर्यंत या दलाची निर्मिती होईल असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन ची अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात असून हा देशदेखील या दिशेने लवकरच पावले उचलण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्ववभूमीवर भारताच्या निर्णयाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

संरक्षण क्षेत्रातील मजबुतीकडे भारत सातत्याने लक्ष पुरवत असून यावर्षीच्या मार्चमध्ये भारताने अँटी सॅटेलाईट क्षेपणास्त्रांची टेस्ट केली होती. ज्याद्वारे अंतराळातील सॅटेलाईट ना लक्ष करून पडण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली होती. याचबरोबर भारताकडून ‘स्पेशल ओपरेशन डिव्हिजन’ ही संस्था देखील स्थापना केली जात आहे ज्याचा हेतू देशात आणि देशाबाहेरील विशेष कारवायांमध्ये मदत करणे हि असेल.

आरोग्य विषयक वृत्त – 

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !