चीनी राष्ट्रपतींच्या भारत भेटीनंतर मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय, ‘या’वर लावली ‘बंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने भारतीय राष्ट्रीय ध्वजा संबंधी आयात धोरणात बदल केले आहेत. या अंतर्गत भारतीय झेंड्याच्या आयातीवर बंदी आणली आहे. नव्या धोरणानंतर इंडियन फ्लॅग कोडनुसार जे झेंडे प्रमाणकारक ठरतील तेच झेंडे आयात होतील. सरकारने झेंड्याचे डिझाइन आणि रंगासंंबंधित नियम जारी केले आहे.

मागील आठवड्यात विदेश व्यापार महानिदेशालयकडून जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले की फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 अंतर्गत पार्ट – 1, सेक्शन 1.2 मध्ये प्रमाणांचे पालन न केल्यामुळे भारतीय झेंड्याची आयात करण्यात येणार नाही.

या मानकांचे पालन न केलेले भारताचे झेंड्यांची आयात देशात होत होती, त्यानंतर त्या संबंधित तक्रार मिळाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. असे अनेक झेंडे प्लास्टिकचे बनवण्यात येत होते आणि मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात करण्यात येत होते.

खादी अ‍ॅण्ड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनने (KVIC) सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय खादी संबंधित लाखो कलाकृतीदारांना दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. खादी अ‍ॅण्ड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (KVIC) च्या मते फ्लॅग कोडनुसार आमचे भारतीय झेंडे फक्त हाताने तयार करण्यात येतात आणि कॉटन किंवा सिल्क खादीपासून बनवण्यात येऊ शकतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंड्यांची मागणी वाढते.

खादीने तयार करण्यात येणाऱ्या झेंड्यांची विक्री
KVIC संसदेच्या एका अधिनियमाद्वारे वैधानिक विभाग आहे, ज्यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय झेंड्यांच्या निर्मितीचा आधिकार आहे. KVIC कडून सांगण्यात आले की मागील दोन वर्षापासून त्यांच्याद्वारे बनवण्यात आलेले राष्ट्रीय ध्वजांच्या विक्रीत घट झाली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी