खुशखबर ! मोदी सरकार देणार वीज आणि पैशाची ‘बचत’ करणारा ‘AC’, जाणून घ्या ‘ऑर्डर’ प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता सरकार देखील तुम्हाला एसी उपलब्ध करुन देणार आहे. ही विक्री सरकारने सुरु देखील केली आहे. सरकारी कंपनी एनर्जी इफिसिएन्सी सर्विसेज लिमिडेडने (EESL) ने १.५ टन इन्वर्टर AC बाजारात आणला असून त्याची विक्री देखील सरकारने सुरु केली आहे. याची किंमत ४१,३०० रुपये असणार आहे. EESL ने फेब्रुवारी २०१९ मध्ये निवासी आणि संस्थांसाठी उच्च दक्षता AC कार्यक्रम सुरु केला होता. या कार्यक्रमांतर्गत हे AC बनवण्यात आले आहेत.

EESLचे सौरभ कुमार यांनी सांगितले की पहल्या टप्प्यात दिल्लीमध्ये BSES राजधानी पावर लिमिटेड, बीएसईएस यमुना पावर लिमिटेड आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (टाटा पॉवर- डीडीएल) च्या वापरकर्त्यांसाठी ५०,००० AC उपलब्ध करुन देण्यात येईल. हे AC पहिले या पहिले खरेदी करा या तत्वावर विक्री करण्यात येणार आहेत. सौरभ कुमार यांनी सांगितले की दिल्लीशिवाय इतर शहरातील ऑर्डर देखील घेण्यात येणार आहे.

असा ऑर्डर करा AC –
ग्राहक EESL च्या ऑनलाइन पोर्टल EESL मार्ट च्या माध्यामातून AC ऑर्डर करु शकतात. एसीच्या किंमती बद्दल त्यांनी सांगितले की एसीची किंमत ४१,३०० रुपये असेल. यात जीएसटी आणि ट्रान्सपोर्टचा देखील समावेश आहे.

३०० युनिट वीज वाचवणार –
कुमार यांनी सांगितले की आमचे उत्पादन फक्त स्पिलिट एसी आहे. ज्याची रेटिंग ५.४ स्टार आहे. हा वीज वाचवणारा एसी आहे. हा एसी वर्षाला वाचवणार ३०० युनिट वीज वाचवणार आहे. याच तुलनेत बाजारात असलेले इतर कंपन्यांचे एसी ५ स्टार रेटिंग असणारे आहेत. आणि त्यांची किंमत ५०,००० रुपये आहे.

‘या’ खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी, जाणून घ्या

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

हॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like