Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! दिवाळी बोनससोबत मिळेल 18 महिन्याचा DA एरियर, मोदी सरकार लवकरच करू शकते घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी दिवसाळीपूर्वी मोठी खुशखबर येणार आहे. कारण, सरकारने (Modi Government) दिडवर्षापासून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा (Dearness allowance – DA) एरियर दिलेला नाही. मात्र, हे पेंडिंग एरियरचे प्रकरण PM नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचले आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावर लवकरच मार्ग काढला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवसाळीपर्यंत 18 महिन्यांचा रखडलेला महागाई भत्ता मिळू शकते.

थकबाकीसाठी PM मोदींना साकडे

भारतीय पेन्शनर्स मंचाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला महागाई भत्ता आणि महागाई मदतीच्या एरियरची थकबाकी देण्यासाठी PM मोदींना (Modi Government) साकडे घातले आहे.
मंचाने पीएम मोदी यांना एक पत्र लिहून याबाबतीत मदत करण्यासाठी विनंती केली आहे.

18 महिन्यापासून रखडला एरियर

अर्थ मंत्रालयाच्या ऑफिस मेमोरेंडमनुसार, खर्च विभागाने म्हटले की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना देण्यात येणारा डीए मूळ वेतनाच्या सध्या 17 टक्केवरून वाढवून 28 टक्के केला जाईल.
मागील वर्षी एप्रिलमध्ये, अर्थ मंत्रालयाने कोविड 19 महामारीमुळे 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यातील (DA) वाढीवर प्रतिबंध लावला होता.
1 जोनवारी 2020 पासून 30 जून 2021 पर्यत डीएचा दर 17 टक्के होता.

नॅशनल कौन्सिल ऑफ JCM चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाळ मिश्रा यांनी म्हटले की, दिड वर्षाचा एरियर अजून दिलेला नाही.
यावर चर्चा सुरू आहे. सरकार एरियर देईल. असा मध्यम मार्ग काढला जाईल जेणेकरून सरकार आणि कर्मचार्‍यांना मदत होईल.

 

Web Title : Modi Government | good news for central govt employees govt will give 18 months da arear with diwali bonus check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात कुत्र्याच्या पिल्ल्यावरुन 2 कुटुंबामध्ये हाणामारी; जाणून घ्या प्रकरण

Multibagger Stock | 1 रुपया 55 पैशांचा शेयर 301.60 रुपयांचा झाला ! 1 लाखाचे केले 1.97 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा Stock?

Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ ‘सनी’ला डेट?