जीएसटीमुळे एका वर्षात तब्बल ५.१८ लाख कोटींची ‘कमाई’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात जीएसटी कराने केंद्राच्या तिजोरीतील पैशात अधिक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये वस्तू आणि सेवा कराअंतर्गत ५.१८ लाख कोटी रुपये आवक झाली आहे. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात ही रक्कम २.९१ लाख कोटी रुपये होती. त्यामानाने मागील वर्षांची आवक चांगली आहे. ही माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत बोलताना दिली.

लोकसभेतील एका लिखीत प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ दरम्यान जीएसटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्यांना ८१,१७७ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. तर त्याच्या मागील वर्षात राज्यांना फक्त ४८,१७८ कोटी रुपये देण्यात आले होते.

उच्च प्राधिकरण जीएसटी कौन्सिलने देशातील करपालन सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे जीएसटी संकलन आता काही काळ सतत सुधारत आहे, असंही सीतारामन यांनी सांगितलं.

व्यावसायिक प्रक्रियांचे मोठया प्रमाणात ऑटोमेशन, ई-बिल प्रणाली, इलेक्ट्रॉनिक इनवॉइस सिस्टम यांची अंमलबजावणी आणि जीएसटीच्या करप्रणाली सुधारण्यासाठी कऱण्यात आली होती. त्याने खुप मोठा फरक पडला आहे.

जुन महिन्यात मात्र यात जीएसटीच्या संग्रहात कमतरता आली. आर्थिक वर्षात २०१९-२० चांगली सुरुवात झाली. मात्र जूनमध्ये जीएसटीचे आवक ९९,९३९ कोटी रुपये झाली. तर एप्रिल महिन्यात १.१३ लाख करोड होते. तर मे मध्ये १.०२ लाख करोड होती. तर पहिल्यांदा जून महिन्यात जीएसटी कराची रक्कम कमी होऊन एक लाख कोटीच्या खाली आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like