Modi Government | मोदी सरकारची खास योजना ! 210 रुपये करा जमा अन् घ्या दरमहा 5 हजाराचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | तुम्हाला तुमच्या भविष्याच्या काळासाठी आर्थिक गुंतवणूक (Investment) करण्याचा प्लॅन असेल, तर त्यावेळी तुम्ही मोदी सरकारची (Modi government) असणारी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) जाणून घ्या. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही एक तुमच्यासाठी चांगला मार्ग आहे. या योजनेत 40 वर्षं वयापर्यंतची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत कमी गुंतवणुकीत प्रति महिना पेन्शनची हमी ही योजना देते. या योजनेच्या माध्यमातून सरकार 60 वर्षांनंतर प्रति महिना एक हजार ते पाच हजार रुपयांच्या पेन्शनची सुरक्षितता देते.

वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन –

समाजातील सर्वांसाठी केंद्र सरकारने (Atal Pension Yojana) अशी योजना सुरु केलीय. यामध्ये, विमा नियामक (Insurance Regulator) आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी या योजनेमधील वयाची अट वाढवण्याची शिफारस केली आहे. या योजनेत प्रति महिना काही गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 व्या वर्षानंतर प्रति महिना 1 हजार ते 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे. यात तिमाही, सहामाही गुंतवणुकीचा देखील पर्याय आहे. प्रति 6 महिन्यांना 1239 रुपये जमा केल्यांनतर 60 व्या वर्षानंतर प्रतिमहिना 5 हजार रुपये अर्थात वर्षांमध्ये साठ हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे.

प्रति महिना 210 रुपये गुंतवा –

प्रतिमहिना पाच हजार रुपये पेन्शन (Pension) मिळवण्यासाठी तसेच वयाच्या 18 व्या वर्षी तुम्ही यात गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला प्रति महिना 210 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. तीन महिन्याची गुंतवणूक करणार असाल तर 626 रुपये आणि सहा महिन्याची 1239 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. दरमहा 1 हजार रुपये पेन्शन अपेक्षित असेल, तर 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीला प्रति महिना केवळ 42 रुपये भरावे लागणार आहे.

कमी वयातच गुंतवणूक करणे फायदेशीर –

वयाच्या 60 व्या वर्षानंतर व्यक्तीला प्रति महिना 5 हजार रुपये पेन्शन हवी आहे, तसेच, व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केलीत, तर तुम्हाला 25 वर्षासाठी दर 6 महिन्यांनी 5323 रुपये भरावे लागणार आहेत. यावरून व्यक्तीची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल. 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास हीच रक्कम केवळ 1.04 लाख रुपये असणार आहे.
अर्थात एकाच पेन्शन रकमेसाठी उशिरा गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला 1.60 लाख रुपये अधिक भरावे लागणार आहेत.

Web Title : Modi Government | invest rs 210 in atal pension yojana and earn up to 5000k per month know the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये;
फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ;
धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक !
पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR