मोदी सरकारकडून ३००० ची ‘किसान’ पेंशन योजना आज पासून सुरू, शेतकऱ्यांनो असं करा ‘रजिस्ट्रेशन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्याकाळात सुरु केलेल्या पेन्शन योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून याची सुरुवात करणार आहेत. या योजनेचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.

किसान पेंशन योजना शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. ही देशभरातील अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल. तसंच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार.

पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसंच ही योजन जीवन विवा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.

दरम्यान, या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी १. आधार कार्ड, २. जमिनीचा सात-बारा, ३. बँक पासबुक, ४. राशन कार्ड, ५. २ फोटोअशा कागदपत्रांची गरज असणार आहे. या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे.

तसंच किसान पेंशन योजनेता लाभ घेण्यासाठी आपण किसान कॉल सेंटरच्या १८००-१८०-१५५१ या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता. तसंच सामान्य सेवा केंद्र आणि राज्याचे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता, अशी माहिती कृषि विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –