मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे चीनसह ‘या’ 4 देशांना बसू शकतो मोठा ‘झटका’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती वस्तूंच्या निर्मितीमध्ये वाढ करण्यासाठी सरकार नॉन आशियायी गोष्टींच्या आयातीवर सरकार बंदी घालू शकते यामध्ये फर्निचर सारख्या गोष्टींचा समावेश असेल. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर मोदी सरकारने असा निर्णय घेतला तर चीन समवेत इतर चार मोठ्या देशांना देखील मोठा झटका बसणार आहे.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री आणि इंटर्नल ट्रेडने सरकारला फर्निचर इम्पोर्ट बाबतचा निर्णय बंद करण्यासाठी सुचवले आहे. याबाबतची एखादी अधिसूचना देखील सरकारद्वारे काढली जाऊ शकते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

एका अंधकाऱ्याने सांगितले की, विदेश व्यापार महासंचालनालय या संदर्भात अधिसूचना घेऊन येण्याची अपेक्षा आहे. फर्निचरच्या आयातीवर बंदी घालण्याचा अर्थ असा आहे की आयातदारांना परदेशी माल पाठविण्यासाठी परवाना किंवा परवानगी घेणे आवश्यक असेल.

चीन जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता, 2018-19 या आर्थिक वर्षात भारताच्या फर्निचरची आयात 4,221 कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी केवळ चीनमधून आयात झालेला माल 2,177 कोटी रुपये इतक्या किमतीचा होता. चीनव्यतिरिक्त मलेशिया, जर्मनी, इटली आणि सिंगापूर या देशांमधून देखील मोठ्या प्रमाणावर भारतात फर्निचर येत असते.चीन जगातील विविध प्रकारच्या फर्निचरची निर्यात करणारा देश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेत्रामध्ये भारताची परिस्थिती जरा नाजूक आहे कारण हे सेक्टर खंडित आहे आणि असंघटित देखील आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने रिफाइंड पाम तेलाच्या आयातीवर या प्रकारे निर्बंध लादले होते की, यामुळे मलेशियामधील मोठा बाजार निराश होणार होता.

 

फेसबुक पेज लाईक करा