Modi Government | खुशखबर ! आता सरकार मजूरांना दर महिना देणार 3,000 रुपये पेन्शन! ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

नवी दिल्ली : Modi Government | सरकारने मजूरांचे वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मजूरांना वृद्धत्वात खर्चासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी एक चांगली योजना आहे. या अंतर्गत फेरीवाले-विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाप्रकारचे काम करणारे इतर मजूरांना पेन्शन मिळेल. सरकार या योजनेंतर्गत पेन्शन गॅरंटी देत आहे. या योजनेत केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. या योजनेबाबत जाणून (Modi Government) घेवूयात…

रोज केवळ 2 रुपये जमा करा

या योजनेत 55 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर रोज 2 रूपये वाचवून वार्षिक 36000 पेन्शन मिळवू शकता. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल. ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

हे आहेत आवश्यक कागदपत्र आणि वय

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

सहज होईल रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल. यानंतर
तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

द्यावी लागेल ही माहिती

जर तुमचे (EPF / NPS / ESIC) ईपीएफ / एनपीएस / ईएसआयसी खाते अगोदरपासूनच असेल तर हे खाते उघडता येणार नाही.

हे घेऊ शकतात स्कीमचा फायदा

पीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक खाते उघडू शकतात. किंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न 15
हजार रूपयांपेक्षा कमी आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.

टोल फ्री नंबरवरून घ्या माहिती

सरकारने योजनेसाठी कामगार विभागाचे कार्यालय, LIC, EPFO मध्ये मजूर सुविधा केंद्र बनवले आहे. येथे
जाऊन मजूर योजनांची माहिती घेऊ शकता. तसेच सरकारने योजनेसाठी 18002676888 टोल फ्री नंबर
जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून सुद्धा येाजनेची माहिती घेऊ शकता.

हे देखील वाचा

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Government | pm shram yogi mandhan yojana status benefits eligibility launch date know here detail labours will get pension

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update