CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

मुंबई : CBI Officer Arrest | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लिन चिट देणारा जो अहवाल सोशल मिडियावर फिरत होता, तो सीबीआयच्या कार्यालयातच बनावट अहवाल तयार केला असून याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याच एका अधिकार्‍याला अटक केली (CBI Officer Arrest) आहे. आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आणखी चार ते पाच जणांना याप्रकरणात अटक होऊ शकते, असे सांगतिले जात आहे.

उपनिरीक्षक अभिषेक तिवारी (CBI Arrest Abhishek Tiwari) असे अटक केलेल्या सीबीआय
अधिकार्‍याचे नाव आहे. सीबीआयने आज अधिकृतपणे सीबीआयने अभिषेक तिवारी याला अटक केली असल्याचे सांगितले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली असल्याचा अहवाल गेल्या आठवड्यात सोशल मिडियावर फिरत होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, सीबीआयने हा अहवाल बाहेर कसा आला याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सीबीआयच्या कार्यालयात ज्या संगणकावर हे अहवाल टाईप केले जातात. त्याच संगणकावर व्हायरल झालेला अहवाल टाईप करण्यात आला आहे. मुळ अहवालात फेरफार करुन हा अहवाल तयार करुन त्यानंतर तो व्हायरल करण्यात आला.

सीबीआयने केलेल्या चौकशीत अभिषेक तिवारी याला कोणी तरी आपल्या जाळ्यात ओढले. त्याला लाच देऊन हा अहवाल बनविला असल्याचे सांगितले जात आहे. तिवारी याचे अलाहाबाद येथील बँक खात्यात हे पैसे जमा झाले असून सीबीआयने हे बँक खाते गोठविले आहे. त्याचबरोबर हा अहवाल कोणी व्हायरल केला याचा तपास केला जात असून एका वकिलासह दोघांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अहवाल बाहेर येऊन तो सोशल मिडियावर कोणी कोणी व्हायरल केला याचा तपास केला जात आहे. त्यामुळे या व्हायरल क्लिन चिट प्रकरणात आणखी अनेक घडामोडी घडण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धुराळा उडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Vegetarian Protein | ‘या’ 10 शाकाहरी गोष्टींत असतं चिकन लेग पीस इतकं ‘प्रोटीन’, आहारात करा समावेश; जाणून घ्या

Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : CBI Officer Arrested | CBI arrest abhishek tiwari in anil deshmukh clean chit matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update