मोदी सरकार पुन्हा आणणार स्वस्त ACची ‘स्कीम’, जाणून घ्या खरेदीची पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसीची गरज आता सर्वांनाच असते. परंतू त्यावर खर्च होणारा पैसा अधिक असतो. त्यामुळे सामान्यांना एसी घेणे परवडत नाही, परंतू आता सरकारच तुम्हाला एसी उपलब्ध करुन देणार आहे. ही विक्री सरकारने सुरु देखील केली आहे. सरकारी कंपनी एनर्जी इफिशिएन्सी सर्विसेज लिमिटेडने (EESL) ने 1.5 टन इन्वर्टर AC बाजारात आणला असून त्याची विक्री देखील सुरु केली आहे. EESL ने फेब्रुवारी 2019 मध्ये निवासी आणि संस्थांसाठी उच्च दक्षता AC कार्यक्रम सुरु केला होता. या कार्यक्रमांतर्गत हे AC बनवण्यात आले आहेत.

EESL ने सांगितले की, ते पुढील वर्षी मार्च पर्यंत उच्च दक्षता कंडीशनिंग कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख एसी खरेदी करतील. EESL चे एस. पी. गणनायक म्हणाले की, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत खरेदी 600 कोटी रुपयांपर्यंत पोहचलू शकते. तसेच एसीच्या किंमतीत आणखी 15 टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात दिल्लीमध्ये BSES राजधानी पावर लिमिटेड, बीएसईएस यमुना पावर लिमिटेड आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (टाटा पॉवर- डीडीएल) च्या वापरकर्त्यांसाठी 50,000 AC उपलब्ध करुन देण्यात आले होते. हे AC पहिले या पहिले खरेदी करा या तत्वावर विक्री करण्यात येणार आहेत. EESL च्या सौरभ कुमार यांनी सांगितले की दिल्लीशिवाय इतर शहरातील ऑर्डर देखील घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात याची किंमत 41,300 रुपये होती.

300 युनिट वीज वाचवणार
हे उत्पादन फक्त स्पिलिट एसी आहे. ज्याची रेटिंग 5.4 स्टार आहे. हा वीज वाचवणारा एसी आहे. हा एसी वर्षाला वाचवणार 300 युनिट वीज वाचवणार आहे. याच तुलनेत बाजारात असलेले इतर कंपन्यांचे एसी 5 स्टार रेटिंग असणारे आहेत. आणि त्यांची किंमत 50,000 रुपये आहे.

असा ऑर्डर करा AC
ग्राहक EESL च्या ऑनलाइन पोर्टल EESL मार्टच्या माध्यामातून AC ऑर्डर करु शकतात. मागील वर्षी एसीची किंमत 41,300 रुपये होती. यात जीएसटी आणि ट्रान्सपोर्टचा देखील समावेश होता.