खुशखबर ! मोदी सरकार मनरेगाअंतर्गत कामगारांना देणार दररोज 250 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) ची व्याप्ती आणखी एक पाऊल वाढवणार आहे. केंद्र सरकार मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देईल. प्रशिक्षण घेण्यासाठी मजुरांना दिवसाला 250 रुपये भत्ता देण्यात येणार आहे.

मनरेगा मजदूरों को रोजाना 250 रुपये देगी मोदी सरकार, जानें क्या है प्लान?

कृषी विज्ञान केंद्रावर दिले जाणार प्रशिक्षण –

ऑक्टोबरपासून ग्रामीण विकास मंत्रालय मनरेगा नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या चांगल्या संधींसाठी प्रशिक्षण देईल. प्रशिक्षणादरम्यान कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी भत्ता म्हणून मनरेगा कामगारांना दिवसाला 200 ते 250 देईल. या मनरेगा मजुरांना देशभरात पसरलेल्या कृषी विज्ञान केंद्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. या मजुरांना सेंद्रिय खत निर्मिती व कृषी विज्ञान केंद्रांवर पीक उत्पादनाच्या साठवणुकीचे प्रशिक्षण दिले जाईल.

मिस्त्री आणि प्लॅबरचे प्रशिक्षण दिले जाणार –

यामध्ये साइटवरील 40 दिवसांच्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल. मिस्त्री काम प्रशिक्षण आणि प्लंबिंगच्या कामासाठी सरकारने 40-दिवसांचे ऑन – साइट मॉड्यूल तयार केले आहे. ग्रामविकास सचिव अमरजित सिन्हा म्हणाले की, 18 ते 35 वर्षे वयोगटातील मनरेगा कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मोदी 2.0 सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंडामध्ये समावेश आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पायलट प्रकल्प सुरू होऊ शकेल.

आरोग्यविषयक वृत्त