मोदी सरकार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाखो लोकांना आज मिळणार पैसे, अश्याप्रकारे तपासा आपले नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वांना पक्की घर मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना ( PMAY) सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोदी सरकार उत्तर प्रदेशला बुधवारी मोठी भेट देणार आहेत. या योजनेंतर्गत सुमारे 6 लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. ही आर्थिक मदत 2691 कोटींची आहे. सरकारच्या या योजनेमुळे प्रत्येकाचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. ज्या 6 लाख लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे त्यापैकी 5.30 लाखांना पहिला हप्ता तर उर्वरितांना दुसरा हप्ता मिळणार आहे.

पीएमएवायला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी बनविली गेली आहे. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटांना कमी उत्पन्न असणार्‍या लोकांसाठी ही क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे. यात गृह कर्जावरील व्याज दरावर अनुदान आहे. ही योजना देशभरातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून देण्यात येणारे अडीच लाख रुपयांचे अनुदान, जे प्रोत्साहनपर काम करते.

अश्याप्रकारे सूचीमध्ये तपासा नाव…

–  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी आपण https://rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या लिंकवर आपली नोंदणी आयडी प्रविष्ट करुन स्थिती तपासू शकता.

– आपल्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर पीएमएवाय-ग्रामीणच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधित माहिती घ्या.

–  https://rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx आपल्या ब्राउझरवर या लिंकला अ‍ॅक्सेस करा.

–  पुढील पेजवर आपणास राज्य, जिल्हा, गट (विकास खंड), पंचायत, योजनेचे नाव आणि इतर तपशील निवडावे लागतील.

–  सबमिशन केल्यानंतर आपण आपले वैयक्तिक तपशील, बँक तपशील, होम साइटचा तपशील, मंजुरी आणि सर्व माहिती पाहण्यास सक्षम असाल.