आता 8 वा वेतन आयोग नाही ! सरकारी नोकरदारांच्या पगारी नव्या पध्दतीने वाढणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरदारांसाठी खुशखबर देणारा वेतन आयोग आता यापुढे नसणार आहे अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असणारा सातवा वेतन आयोग हा शेवटचा वेतन आयोग ठरण्याची शक्यता आहे. येथून पुढे आठवा वेतन आयोग नसणार आहे.

वेतन आयोगाकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार ठरवला जातो. मग आता वेतन आयोगच नसेल तर कर्मचाऱ्यांचा पगार कोण ठरवणार? आता कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यासाठी नवीन पद्धत लागू होणार आहे. या नव्या पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांचा पगार ठरवला जाईल. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कडक निर्णय घेतले आहेत.

अशी असेल पगारवाढ ठरवण्याची ‘आयक्रॉइड’ पद्धत

या नव्या आयक्राॅइड पद्धतीत पगारवाढ ही तुमची कामगिरी आणि चलनवाढीवर अवलंबून असेल. सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होणाऱ्या चढउतारीचा ही परिणाम या पगारवाढीवर होईल. पण महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचा परफाॅर्मन्स पाहिला जाईल. जीवनाश्यक वस्तुंच्या किंमतीत होणारी वाढ आणि कामगिरी या दोन घटकांवरून पगार ठरवण्यात येणार आहे.

अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधात सरकारचे कडक धोरण

मोदी सरकारने या आधीच अर्थमंत्रालयातील निष्काळजी, अकार्यक्षम अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली होती. यावरूनच मोदी सरकारने अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरुद्ध कडक पाऊले उचलण्याचे संकेत दिले होते. तसेच कार्मिक मंत्रालयाने भ्रष्टाचारी, अकार्यक्षम अधिकाऱ्यांची यादी तयार करायला सांगितले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचा आढवा घेऊन अहवाल तयार करण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत. या अहवालानंतर अशा कामचुकार अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like