Modi Govt -Dearness Allowance | खुशखबर! दिवाळी जोरात साजरी होणार, केंद्रिय कर्मचारी, पेन्शर्सला ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु

नवी दिल्ली : Modi Govt -Dearness Allowance | दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आजी-माजी कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी केली आहे. या वाढीचा प्रस्ताव कधीही कॅबिनेट बैठकीसमोर येऊ शकतो. (Modi Govt -Dearness Allowance)

दरम्यान, ऑक्टोबरच्या पगारात कर्मचाऱ्यांना हा वाढीव महागाई भत्ता मिळू शकतो. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. कारण गेल्यावर्षी २४ ऑक्टोबरला दिवाळी होती. तेव्हा केंद्राने २८ सप्टेंबरलाच डीए चार टक्क्यांनी वाढविला होता. आता दिवाळी थोडी उशिराने असून १२ नोव्हेंबरला साधारण महिना असताना हा निर्णय होऊ शकतो. (Modi Govt -Dearness Allowance)

यावेळी डीए ४६ टक्के होईल, असे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस सी. श्रीकुमार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारने संसदेत ८ वा वेतन आयोग स्थापन करण्यास नकार दिला असला तरी, ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा जानेवारी २०२४ नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली जाईल. २०१३ मध्ये ७ वा वेतन आयोग स्थापन झाला होता.

कर्मचारी संघटनांनी केला आहे की, जानेवारी २०२४ मध्ये, जेव्हा डीएमध्ये (संभाव्य) चार टक्के वाढ होईल आणि
महागाई भत्ता ५०% असेल, तेव्हा केंद्र सरकारला नवीन वेतन आयोग जाहीर करावा लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?

Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी ! निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी