इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘PM नरेंद्र मोदीच कोरोनाचे सुपर स्प्रेडर’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा यामुळे देशातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेली आहे. त्यातच आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी थेट कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे म्हंटल आहे. या वक्तव्यामुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. यांसंदर्भात द ट्रेब्युने वृत्त दिले आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही मोदींनी कुंभमेळा तसेच राजकीय सभांना सहमती दर्शवल्याने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे डॉ. नवज्योत यांनी म्हंटल आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे मात्र पंतप्रधानांनी कोरोना संदर्भातील सर्व नियम मोडून मोठ्या प्रचार सभांना परवानगी दिली. देशात जानेवारी २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र मोदींनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली असे डॉ नवज्योत यांनी म्हंटल आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
कोरोनाची दुसरी लाट सर्वोच्च स्तरावर अजून पोहोचली नाही.

तोपर्यंतच देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात पंतप्रधानांनी काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही असंही डॉ. नवज्योत म्हणाले. मोदींच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणजे देशात आज निर्माण झालेली परिस्थिती आहे असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हंटल आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावल्याचे सांगत केंद्राने अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासंदर्भात होकार न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. सरकारने या गोष्टीना फार महत्त्व दिले नाही असा आरोपही नवज्योत यांनी केला आहे. स्मशानाबाहेर लागलेल्या रांगा या देशातील परिस्थितीची दाहकता दाखवत असल्याचे सांगत डॉ नवज्योत म्हणाले, शेतकरी आंदोलनावर काहीही तोडगा काढला नाही. मोदी सरकारने अनेक दिवस हे आंदोलन सुरु ठेऊ दिल. त्यामुळेही कोरोनाचा धोका वाढला अशी टीकाही डॉ. नवज्योत यांनी केली आहे.