Mohd. Yakoob Shekha | याकुब शेख यांची भारताच्या हज कमिटीच्या सीईओ (CEO) पदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mohd. Yakoob Shekha | भारतीय रेल्वे अकाऊंट सर्व्हिसमधील (indian railway accounts service- IRAS) 2011 च्या बॅचचे अधिकारी याकुब शेख (Mohd. Yakoob Shekha (IRAS 2011)) यांची अल्पसंख्यक कार्य मंत्रालयाने (ministry of minority affairs haj division) हज कमिटी ऑफ इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (chief executive officer haj committee of india) म्हणून नियुक्ती केली आहे.

याकुब शेख (Mohd. Yakoob Shekha ) हे मुळचे प्रयागराज येथील राहणारे आहेत. सध्या ते रेल्वेमध्ये उपवित्त सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. लवकरच ते मुंबईतील हज कार्यालयात आपल्या नवीन पदाची सुत्रे हाती घेतील. याकुब शेख यांनी अलाहाबाद विद्यापीठातून 2004 मध्ये पदवी मिळविली असून 2006 मध्ये त्यांनी political science या विषयात पदवीत्तर पदवी मिळवली. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ते २००७ मध्ये दिल्लीला आले. तिसर्‍या प्रयत्नात 2011 मध्ये आय आर ए एस (IRAS) पास झाले. त्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये बिलासपूरमध्ये त्यांना पहिली नियुक्ती मिळाली होती.

Web Titel :- Mohd. Yakoob Shekha | Appointment of Yakoob Shekha as CEO of Haj Committee of India

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

National Women Commission | NWC ची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर टीका; चंद्रमुखी देवी म्हणाल्या – ‘मागील 2 वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही’

MLA P.N. Patil | सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, एक कोटीची मागणी ! आमदारासह मुला-मुलीवर गुन्हा

Pune Crime | पुण्यात कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करुन खंडणी मागणारे बाप-लेक गजाआड