‘त्या’ मेसेजचा जाब विचारल्याने सैनिकाच्या पत्निचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – आईच्या मोबाइलवर मेसेज का केलास, असा जाब विचारल्याने तिघानी घरात घुसून, लष्करातील जवानाच्या पत्नीचा विनयभंग करत मुलाला जबर मारहाण केली. ही धक्कादायक घटना दिघी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पंडित शिंदे, विनोद शिंदे आणि प्रमोद शिंदे या तिघांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला आणि त्यांचा १९ वर्षीय मुलगा हे आरोपींच्या घरा शेजारी राहतात. पिडितेचे पती लष्करात आहेत.  काही दिवसांपूर्वी पिडित महिलेच्या मुलाने आरोपी पंडित शिंदे याला तुम्ही माझ्या आईच्या मोबाइलवर ‘आठवण येते का?’ असा मेसेज का टाकला असा जाब त्यांच्या घरातील सदस्यांसमोरच विचारला होता. त्यानंतर आरोपी पंडित शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे यांनी घरात घुसून पिडित महिलेच्या मुलाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, यात मुलगा गंभीर जखमी झाला. याशिवाय आरोपींनी महिलेचा विनयभंग केला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस भरती