श्रीदेवींचा ‘हा’ शेवटचा चित्रपट लवकरच होणार चीनमध्ये प्रदर्शित 

मुंबई : वृत्तसंस्था – श्रीदेवींची मुख्य भूमिका असलेला त्यांचा अखेरचा ‘मॉम’ चित्रपट लवकरच चीन मध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता त्यांच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिस चांगली कमाई करून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला होता.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीया बाबत आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. २२ मार्च २०१९ ला हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मॉम’ हा श्रीदेवींचा ३०० वा चित्रपट होता. या चित्रपटानंतर शाहरूख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात श्रीदेवी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या मात्र, मुख्य भूमिका असलेला ‘मॉम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आता त्यांचा हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांवर आपली जादू कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो का ? हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.

दोनच दिवसापूर्वी श्रीदेवी यांच्या निधनाला एक वर्ष झालं होत. यावर जान्हवी कपूरने एक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली होती. तसेच काही कलाकारांनी देखील त्यांच्या बद्दल भावुक पोस्ट लिहून फोटो  शेअर केले होते.