कच्च्या तेलाची किंमती 20 डॉलरनं घसरणार, भारताला मिळणार ‘हे’ फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच कच्च्या तेलाची किंमत 60 डॉलर प्रति बॅरल वरून 20 डॉलरवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमी होणाऱ्या तेलाच्या मागणीमुळे किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात घसरण सुरु असून यामध्ये आणखी घसरण आली तर  हे दर 30 डॉलर ते 20 डॉलरपर्यंत खाली जाऊ शकतात.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मात्र हि चांगली गोष्ट असून यामुळे भारतीयांना तेल स्वस्तात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात चांगले असलेल्या  ब्रेंट क्रूड तेलाची किंमत सध्या 60 डॉलर प्रतिबॅरल आहे. त्याचबरोबर वेस्ट टेक्सास  तेलाची किंमत 55 डॉलर प्रति बॅरल आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मंदीचा खतरा

रिअल व्हिजन ग्रुपचे राउल पैन यांनी बोलताना सांगितले कि, सध्या जागतिक मंदीचा धोका संपूर्ण जगाला आहे. येणाऱ्या काळात यामध्ये आणखी वाढ होणार आहे. अनेक देश यामध्ये सापडले असून अमेरिका देखील यामध्ये सापडू शकते. व्यापारी युद्धामुळे हे सर्व होत असून चीनमध्ये देखील मंदी दिसून येत आहे. भारताच्या विकासदरात देखील घट झाल्याचे त्यांनी म्हटले.

भारताला मोठा दिलासा मिळणार

भारत आपल्या मागणीच्या जवळपास 80 टक्के खनिजतेल हे आयात करत असतो. त्यामुळे या कमी होणाऱ्या दरांचा भारताला मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे किंमत कमी होऊन याची भारतीय अर्थव्यवस्थेला देखील मोठी मदत होणार आहे. यामुळे आयात खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे महागाई देखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –