Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मनी लॉन्ड्रींग (Money Laundering Case) प्रकरणी ईडी कडून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 3 वेळा समन्स पाठवण्यात आला होता, पण काही कारणाने जॅकलीन ईडी ऑफिसला पोहचू शकली नाही. या वेळी दिल्ली मध्ये जॅकलीनला ईडी समोर हजर होण्यास सांगतिले आहे, 4 थ्या वेळी जॅकलीनने ईडी ऑफिस मध्ये जाऊन मनी लॉन्ड्रींग प्रकरणा (Money Laundering Case) बद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

36 वर्षांची जॅकलीन या आधी ऑगस्ट मध्ये ईडी कार्यालयात येऊन गेली आहे त्या वेळी देखील आपले मत ईडी समोर मांडले आहे. काल 20 ऑक्टोम्बर रोजी जॅकलीनला दिल्लीच्या ईडी ऑफिस मध्ये बोलवण्यात आले होते. 3.30 पासून ईडी ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी चौकशीस सुरुवात केली होती, 7 ते 8 तासांनी जॅकलीनची चौकशी पूर्ण झाली त्या नंतर जॅकलीन प्रवर्तन निर्देशालय मधून बाहेर पडली.

 

मनी लॉन्ड्रींगच्या (Money Laundering Case) या केस मध्ये दिल्लीच्या तिहार जेल मध्ये बंद असलेला
सुकेश चंद्रशेखर आणि पत्नी लीना मारिया यांच्याशी हे प्रकरण जोडले गेले आहे.
चंद्रशेखरच्या खात्यातून जॅकलीनच्या परिजनांच्या खात्या मध्ये 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) फसवल्याचा सुद्धा आरोप आहे.

 

सध्या जॅकलीन आगामी चित्रपट ‘रामसेतू’ च्या शूटिंग मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत उटी’त व्यस्त होती.
त्या मुळे ईडी कडून 3 वेळा समन्स पाठवून जॅकलिन ईडी कार्यालयात पोहोचली नसल्याचे तिने माध्यमांना सांगितले आहे.

 

Web Title :- Money Laundering Case | jacqueline fernandez reaches ed office in money laundering case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane on Uddhav Thackeray | नारायण राणेंचा CM ठाकरेंवर घणाघात; म्हणाले – ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म, आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Digital Transaction On Whatsapp | बँक अकाऊंट लिंक न करता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया