Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Monsoon Diet Tips | पावसाळ्यात बहुतांश आजार खाण्या-पिण्याशी संबंधित असतात. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने खाण्या-पिण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या हंगामात खाण्याच्या कोण-कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे ते जाणून घेवूयात…

1. भाज्या :
पावसाळ्यात पालक, मेथी, चंदन बटवा, वांगी, कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्या टाळल्या पाहिजेत. या हंगामात किड्यांची फर्टिलिटी वाढते. विशेषता पालेभाज्यांमध्ये ते खुप वेगाने वाढतात, यासाठी पालेभाज्या खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

2. मासे आणि इतर सी-फूड :
पावसाळा बहुतांश माशांचा प्रजननाचा काळ असतो. यासाठी मासे आणि सी-फूड खाल्ल्याने फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो.

3. मशरूम :
या हंगामात मशरूम खावू नये. कारण ते जमीनीत उगवत असल्याने अनेक प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेकशन होण्याचा धोका वाढतो.

4. तळलेले-भाजलेले आणि स्ट्रीट फूड :
तळलेले-भाजलेले आणि स्ट्रीट फूड या हंगामात खाल्ल्याने पित्त वाढते. आजार वाढतात.

5. कापून ठेवलेली फळे :
खुपवेळ कापून ठेवलेली फळे आणि भाज्या सेवन करू नका. यात जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

6. मांसाहार
पावसाळ्यात पचनक्रिया कमजोर असल्याने मांसाहार शक्यतो टाळा.

Web Titel :- monsoon diet tips avoid eating these things during rainy season it can cause several serious diseases see latest health care tips marathi

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Update | तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदला गेलाय का, ‘या’ पद्धतीने तपासा

Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | एमडी डॉक्टर सुजित जगतापने या अगोदरही लावला होता महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा